Organic Maps : ऑफलाईन भटकंती, सायकल व मार्गनिर्देशन
Organic Maps हा हायकिंग, सायकलिंग आणि ड्रायव्हिंगसाठी गोपनीयता-केंद्रित ऑफलाइन नकाशे आणि GPS अॅप आहे. पूर्णपणे विनामूल्य. विना जाहिराती. महितीचा मागोवा नाही. मुक्त स्रोत समुदायाने आणि MapsWithMe/Maps.Me च्या संस्थापकांनी प्रेमाने विकसित केले. OpenStreetMap डेटाद्वारे समर्थित.
Organic Maps हे आजकाल विनाइंटरनेटचे सर्व वैशिष्ट्यांसकट चालणाऱ्या मोजक्या अॅप पैकी एक अॅप आहे. Organic Maps इन्स्टॉल करा, नकाशे डाऊनलोड करा, तुमचे सिम कार्ड टाकून द्या आणि नेटवर्कवर एकही बाइट न पाठवता एकाच बॅटरी चार्जवर आठवडाभराच्या प्रवासाला निघा.
डिसेंबर 2025 मध्ये, Organic Maps ने 60 लाख इन्स्टॉल्सचा टप्पा गाठला. आम्हाला वाढण्यास मदत करा!
Organic Maps इथून डाऊनलोड व स्थापीत करा : AppStore, Google Play, FDroid, Huawei AppGallery, Obtainium, Accrescent
वैशिष्ट्ये
प्रवाशी, पर्यटक, गिर्यारोहक व सायकल चालकांसाठी Organic Maps हे अत्यंत ऊपयुक्त ऍप आहे:
- OpenStreetMap च्या आभारे, इतर नकाशांवर अस्तित्वात नसलेल्या ठिकाणांसोबत सखोल ऑफलाईन नकाशे
- सायकलिंग मार्ग, भटकंती व चालण्याचे मार्ग
- समोच्च रेषा, उंची प्रोफाइल, शिखरे व चढ-उतार
- व्हॉइस मार्गदर्शन आणि CarPlay/Android Auto सह कार, सायकली आणि चालण्यासाठी टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश
- मेट्रो/सबवे नकाशे
- नकाशावर वेगवान ऑफलाईन शोध
- KML, KMZ, GPX फॉरमॅटमध्ये बुकमार्क आणि ट्रॅक, GeoJSON
- तुमच्या डोळ्यांच्या संरक्षणासाठी, गडद मोड
- देश आणि प्रदेश जास्त जागा घेत नाहीत
- लोकप्रिय ठिकाणांसाठी विकिपीडिया लेख
- विनामूल्य व मुक्त स्रोत
ऑर्गेनिक (सेंद्रिय) कशाला?
Organic Maps हे शुद्ध व सेंद्रिय आहे, व प्रेमाने निर्मित आहे:
- तुमच्या गोपनीयतेचा आदर करते
- तुमची बॅटरी वाचवते
- कोणतेही अनपेक्षित मोबाइल डेटा शुल्क नाही
Organic Maps अॅप माहिती चोरांपासून आणि इतर वाईट गोष्टींपासून मुक्त आहे:
- विना जाहिराती
- महितीचा मागोवा नाही
- डेटा संग्रह नाही
- त्रासदायक नोंदणी नाही
- कोणतीही अनिवार्य शिकवणी नाही
- त्रासदायक ईमेल नाही
- अधिसूचना नाही
- कचरासॉफ्टवेयर नाही
कीटकनाशक नाहीशुद्ध व सेंद्रिय!
Exodus गोपनीयता Project कडून तपासलेले ऍप:
iOS साठी TrackerControl कडून तपासलेले iOS ऍप:
तुमच्यावर गुप्तहेरी करायला Organic Maps अनावश्यक परवानग्या मागत नाही:
Organic Maps मध्ये आम्ही ह्या विचारांचे आहोत की गोपनीयता हा प्रत्येकाचा मानवी हक्क आहे:
- Organic Maps हे एक समुदाय चलित मुक्त स्रोत प्रकल्प आहे
- बिग टेकच्या गुप्तहेरी नजरेपासून आम्ही तुमचे रक्षण करतो
- तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित रहा
गुप्तहेरी नाकारा - तुमचे स्वातंत्र्य स्वीकारा.
ह्या निःशुल्क ऍपचा खर्च कोण काढत आहे?
हे ऍप सर्वांसाठी विमानुल्य आहे. आम्हाला पाठिंबा द्यायला कृपया देणगी द्या!
सोयीस्करपणे देणगी देण्यासाठी, खाली दिलेल्या तुमच्या पसंतीच्या पेमेंट पद्धतीच्या चिन्हावर क्लिक करा:
खालील प्रिय संस्थात्मक प्रायोजकांनी काही पायाभूत सुविधा खर्च कव्हर करण्यासाठी आणि निवडलेल्या नवीन वैशिष्ट्यांच्या विकासाला निधी देण्यासाठी लक्ष्यित अनुदान प्रदान केले आहे:
|
|
शोध आणि स्रोत सुधारणा प्रकल्प NGI0 Entrust Fund द्वारे निधीत केला गेला. NGI0 Entrust Fund ची स्थापना NLnet Foundation ने युरोपियन कमिशनच्या Next Generation Internet कार्यक्रमाच्या आर्थिक पाठिंब्याने, DG Communications Networks, Content and Technology च्या अंतर्गत अनुदान करार क्रमांक 101069594 अंतर्गत केली आहे. |
|
|
Google ने 2022, 2023, 2024, 2025 कार्यक्रमांदरम्यान Google Summer of Code कार्यक्रमात विद्यार्थी प्रकल्पांना पाठिंबा दिला. उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये Android Auto, विकिपीडिया डंप एक्स्ट्रॅक्टर, Android ट्रॅक रेकॉर्डिंग यांचा समावेश आहे. |
|
ISP Mythic Beasts आम्हाला नकाशा डाउनलोड आणि अपडेट्स होस्ट करण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी 400 TB/महिना पर्यंत मोफत बँडविड्थसह दोन व्हर्च्युअल सर्व्हर प्रदान करतो. |
|
|
44+ Technologies आम्हाला व्हिएतनाम आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये नकाशे सर्व्ह करण्यासाठी सुमारे $12,000/वर्ष किमतीचा एक मोफत समर्पित सर्व्हर प्रदान करतो. |
|
|
FUTO ने फेब्रुवारी 2023 मध्ये Organic Maps ला $1000 चे सूक्ष्म अनुदान दिले. |
समुदाय
Apache License 2.0 परवान्य अंतर्गत Organic Maps हे एक मुक्त स्रोत सॉफ्टवेअर आहे.
- आमच्या बीटा कार्यक्रमात सहभागी होऊन, ऍप वैशिष्ट्ये सुचवा, व आम्हाला बग(त्रुटी) कळवा:
- बग किंवा त्रुटी आम्हाला इशू ट्रॅकर or ईमेल द्वारे कळवा.
- नवीन कल्पना किंवा वैशिष्ट्ये सुचवण्यासाठी चर्चा करा.
- नविनतम माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनल किंवा मैट्रिक्स स्पेस चे सदस्य व्हा.
- इतर वापरकर्त्यांसोबत चर्चा करायला आमच्या टेलिग्राम गटात सहभागी व्हा.
- आमच्या GitHub पृष्ठावर भेट द्या.
- FOSStodon, Facebook, Twitter, Instagram, Bluesky, Threads, Reddit, LinkedIn, TikTok वरुन आमची माहिती मिळवा.
